पुणे जिल्हा परिषदेविषयी

  • स्व. यशवंतराव चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली मे १९६२ मध्ये पुणे जिल्हा परिषदेची स्थापना झाली.

  • स्व. शंकरराव दशरथराव उरसळ यांना पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होण्याचा पहिला मान मिळाला. त्यांनी दि १२/८/१९६२ ते ११/८/१९७२ पर्यत अध्यक्ष पद भूषविले. तेव्हापासून आज अखेर 22 अध्यक्ष झाले. सध्या मा.श्री.विश्वासराव देवकाते अध्यक्षपद भूषवत आहेत.

  • आज रोजी १३ पंचायत समित्या व १४०७ ग्राम पंचायती ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्यरत आहेत. शासनाच्या कोणत्याही नवीन योजना, अभियान, मोहिम, राबविण्यात पुणे जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे.

  • सन 2012 साली पुणे जिल्हा परिषद आय.एस.ओ. 9001-2008 प्रमाणित झालेली आहे.

  • यशवंत पंचायत राज अभियान सन २०११-२०१२ जिल्हा स्तरावर महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे जिल्हा परिषद व्दितीय क्रमांक मानकरी ठरलेली आहे व पंचायत समिती स्तरावरील महाराष्ट्र राज्यमध्ये पंचायत समिती बारामती व्दितीय क्रमांक मानकरी ठरलेली आहे. आणि ग्रामपंचायत कांदली ता.जुन्नर गामपंचायत स्तरावरील महाराष्ट्र राज्यमध्ये तृतीय क्रमांक मानकरी ठरलेली आहे.