शासनामार्फत वेळोवेळी जाहीर होत असलेल्या विविध योजनांची
पात्रता तपासण्यासाठी संबंधित अर्जदारांच्या आधार क्रमांकाची माहिती
सदर वेब-पोर्टल द्वारे घेतली जाते. आधार क्रमांकाचा उपयोग हा निव्वळ
योजनेसाठी संबंधित अर्जदारांची पात्रता पडताळणी करण्यासाठी केला
जातो. अर्जदारांचा आधार क्रमांक हा वेब-पोर्टल मध्ये Bcrypt Hash
Function द्वारे Hash म्हणजे कुटबद्ध केला जातो. आधार क्रमांकाची
नोंद या वेब-पोर्टल मध्ये होत नाही. तसेच हा आधार क्रमांक जिल्हा
परिषदेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यास अथवा अन्य त्रयस्थ व्यक्तीस
उपलब्ध होत नाही. तसेच अर्जदारांची वैयक्तिक जी माहिती घेतली जाते
उदा. संपूर्ण नाव, वैवाहिक स्थिती, जन्म दिनांक, मोबाईल क्रमांक,
शैक्षणिक माहिती, आरोग्य विषयक माहिती, बँकेची माहिती,.हि घेतली जाते
त्याचा उपयोग संबंधित अर्जदारांची विविध योजनांसाठी पात्रता
तपासण्यासाठी केला जातो. हि वैयक्तिक माहिती जिल्हा परिषदेच्या
कोणत्याही पदाधिकाऱ्यास अथवा अन्य त्रयस्थ व्यक्तीस उपलब्ध होत नाही.