पुणे जिल्हा

पंचायती राज

बळवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 1957 साली त्रिस्तरीय पंचायती राज पध्दतीची शिफारस केली आणि त्यानुसार पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचायत राज पध्दतीचे शुभारंभ राजस्थानमध्ये 2 ऑक्टोबर 1959 रोजी केले. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या कायदा, 1961 स्थापन केला आणि कायद्यानुसार 1 मे 1962 रोजी त्रिस्तरीय पंचायत राज पध्दतीचा अंगिकार केला.

जिल्हा परिषदेची रचना

(महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या कायदा, 1961, नियम 9 (1) अन्वये जिल्हा परिषद पुढील व्यक्तींनी मिळून बनलेली असेल) (क) राज्य निवडणुक आयोगातील राजपत्रातील अधिसुचनेद्वारे प्रसिध्दिस दिलेले जिल्हयातील निवडणुक विभागातून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडुन आलेले परिषद सदस्य (जि.प.प्रादेशिक क्षेत्रातील लोकसंख्येनुसार सदस्यांच्या जागांची संख्या निश्चित केली जाते. (ख) जिल्हयातील सर्व पंचायत समिती सभापती कलम 10 अन्वये परिषद सदस्यांचा अधिकार पदाचा कालावधी हा पाच वर्षांचा असेल

जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य संख्या

जिल्हा परिषद एकुण सदस्य - 75

पंचायत समिती एकुण सदस्य - 150

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा

महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या कायदा, 1961, नियम 9)

जिल्हा परिषदेची सर्वोच्च सभा जिल्हा परिषद अध्यक्ष हे सर्वसाधारण सभेचे घटनात्मक अध्यक्ष असतात जिल्हयातील निवडणुक विभागातून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडुन आलेले सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व सभापती हे या सर्वसाधारण सभेचे कायदेशीर सदस्य असतात. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) हे या सर्वसाधारण सभेचे सचिव असतात.