ई.गर्व्हर्नंस

लॅन

पुणे जिल्हा परिषद मुख्यालया कडील सर्व संगणक लॅन व्दारे जोडले असून ते punezp.com या domain मध्ये असून सर्व संगणकाना इंटरनेट सेवा उपलब्ध करुन देणेत आली आहे.

ब्रॉड बॅड इंटरनेट

सर्व पंचायत समिती कार्यालयतील संगणक लॅन व ब्रॉड बॅड इंटरनेट ने जोडले असून त्याव्दारे ई-मेलचा, बीडीएस इत्यादी साठी वापर केला जातो.

व्हिडियो कॉन्फरसिंग

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे हे दर सोमावारी skype चा वापर करुन जिल्हयातील सर्व गट विकास अधिकारी जि. प पुणे यांच्याशी विविध विकास कामाचो आढावा नियमीतपणे घेत आहेत.

SMS(short message service)

संगणक कक्षा मार्फत सर्व पुणे जिल्हा परिषदे कडील अधिकारी / कर्मचारी यांना काही महत्वाचे तातडीचे संदेश देणे करिता (short message service) चा उपयोग्य केला जोतो त्यांमुळे वेळाची व दूरध्वनीवरील खर्चाची बचत होते.

वित्त विभाग

वित्त विभागातील ऑनलाईन कामकाजाबाबत

  • http://www.arthsarthipunezp.org या ऑनलाईन संगणकीय आज्ञावली मध्ये जिल्हा परिषद निधी, शासन निधी व अभिकरण निधीचे प्राप्त अनुदान व झाल्‌ेल्या खर्चाची ऑनलाईन माहिती तात्काळ समजते. तसेच सदर आज्ञावली मध्ये योजनानिहाय निधी सर्व विभागांना उपलब्ध करून दिला जातो. त्यामध्ये सर्व विभागाकडून सदर आज्ञावलीमध्ये BDS स्लीप काढून देयक वित्त विभागास प्राप्त होते. वित्त विभागात सदरचे देयक पारित होऊन देयकाची रक्कम ECS व्दारे थेट संबंधीत एजन्सी, ठेकेदार व कर्मचारी यांचे बँक खात्यात जमा केले जाते.
  • सबंधीत विभागाकडून प्राप्त झालेले देयक व प्राधिकार पत्रक तपासणी करून देयकातील रक्कमा सबंधीत पुरवठादार किंवा ठेकेदार यांचे नावे विहीत नमुन्यात अज्ञावलीच्या सहाय्याने तयार होणारे ECS बँकेत दिले जाते व तद्नंतर PDCC बँकव्दारे सदरच्या रकमा सबंधीतांना वर्ग केल्या जातात.
  • वित्त विभागामार्फत दरमहा जिल्हा परिषद सेवेतून जे कर्मचारी निवृत्त होतात त्यांना अदा करावयाच्या रकमा (उदा. पेन्शन/भ.नि.नि. इ.) माहिती दरमहा पुणे जिल्हा परिषद, पुणे चे संकेतस्थळ www.punezp.co.in वर प्रसिध्द केली जाते. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे पेन्शन मंजुरी आदेश व मंजुर झालेली भ.नि.नि रक्कम इ. माहिती तात्काळ समजू शकते.
  • अर्थसारथी संगणकीय आज्ञावलीमध्ये सबंधीत ठेकेदार/पुरवठादार तसेच जिल्हा परिषदेचे कर्मचारी यांना त्यांचे देयकाबाबतची सद्य:स्थितीची माहिती ऑनलाईन घरबसल्या किंवा आपल्या कार्यालयातच पहावयास मिळणार आहे. यासाठी सबंधीत ठेकेदार/पुरवठादर व जि.प. कर्मचारी यांनी याबाबत अर्थसारथी प्रणालीवर आपली माहिती रजिष्टर करणे आवश्यक आहे. रजिष्टर केले नंतर सबंधीतांचा A/C नंबर हा त्यांचा USER ID असेल तसेच Password सबंधीतांनी खालील प्रमाणे स्वत: तयार करावयाचा आहे. याबाबत सबंधीत ठेकेदार/पुरवठादार किंवा जि.प.कर्मचारी यांनी USER ID व PASSWORD वापरून त्यांना आपल्या देयकाची सद्यस्थिती माहिती मोबाईलवर पहावयास मिळेल.

जिल्हा परिषद पुणेचे वित्त विभागामार्फत जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधी परतावा / नापरतावा भ.नि.नि. च्या रक्कमा सुलभतेने व तात्काळ काढता येणेसाठी तसेच जिल्हा परिषद सेवतून सेवानिवृत्त होणारे कर्मचारी यांना पेन्शन विषयी लाभ तात्काळ मिळणेसाठी अर्थसारथी प्रणालीवर ऑनलाईन 1. भविष्य निर्वाह निधी 2. गट विमा योजना 3. पेन्शन इ. बाबतची माहिती ऑनलाईन भरून सदरचे फॉर्म अज्ञावलीत आपोआप तयार होऊन कर्मचारी यांची माहिती वरून सबंधीतांना देण्यात येणारे लाभाबाबतचे नमुने तयार होणार आहेत.