ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

पुणे जिल्हा परिषद, पुणे ग्रामीण पाणी पुरवठा बांधकाम विभाग

ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमाची अंमलबजावणी-

ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम मागणी आधारित धोरण असुन केंद्र शासन पुरस्कृत वर्धीत वेग कार्यक्रम, स्वजलधारा व राज्य शासन पुरस्कृत महाजल तसेच बिगर आदिवासी / आदिवासी अंतर्गत कामाचा समावेश करुन सन 2009-2010 पासुन सदर कार्यक्रमांचे रुपांतर राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम असे केले आहे.

पाणी पुरवठा योजनेंतर्गत खालील पाणी पुरवठ्याच्या योजना हाती घेता येतील.

 • साधी विहीर
 • अस्तीत्वातील विहीरींचे रुंदीकरण व खोलीकरण
 • विंधन विहीर (हातपंप)
 • लघु नळ पाणी पुरवठा योजना
 • शिवकालीन पाणी साठवण योजना
 • अस्तीत्वातील योजनेची दुरुस्ती
 • अस्तीत्वातील योजनेतील उद्भवाचे बळकटीकरण
 • योजना विस्तारीकरण
 • पुरक योजना
 • नविन योजना

  वरिलपैकी कोणतीही योजना आपल्या गावासाठी राबवावयाची झाल्यास आपल्या तालुक्यातील उप अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग व गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेशी संपर्क साधावा.
  पाणी पुरवठा योजनेची अंमलबजावणी, त्याचे नियोजन व कार्यवाही तसेच विहित कालावधी खालीलप्रमाणे आहे.

ठळक वैशिष्ट्ये-

धोरणातील महत्वाची तत्वे व प्राधान्यक्रम-

 • गावात अस्तित्वात असलेल्या सर्व पिण्याच्या पाण्याचे उपाययोजनांचा आढावा घेवून त्यातील स्त्रोतांचे संवर्धन व बळकटीकरण करणे, अस्तित्वात असलेल्या योजनांमध्ये सुधारणे करणे.
 • गुणवत्ताबाधीत गावांमध्ये सुरक्षित स्त्रोत विकसीत करण्याकरिता उपाययोजना करणे.
 • गावाच्या लोकसंख्येत झालेल्या वाढीमुळे पुरक योजनांचा विचार करणे.
 • उपाययोजना प्रस्तावित करतांना किमान खर्चावर आधारीत विकल्पाचा विचार करणे.
 • एकच योजना करण्यापेक्षा विकेंद्रीत उपाययोजना किफायतशीर असल्यास त्यास प्राधान्य देणे.
 • 100% घरगुती नळ जोडणेचा समावेश अनिवार्य करणे.
 • गाव कृती आराखडा तयार करणे.
 • काम सुरु करण्यापूर्वी गांव किमान 60 % हागणदारी मुक्त असणे आवश्यक आहे.
 • मागील तीन वर्षात टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केलेल्या गावांना प्राधान्य देणे.

तांत्रिक मान्यता देण्याची कार्यपध्द्ती-

योजनांच्या गाव कृती आराखड्यास व अंदाजपत्रकास ग्रामसभेचा ठराव पारित झाल्यावर सक्षम प्राधिकरणांनी आधी प्रशासकीय व नंतर तांत्रिक मान्यता द्यावी.

प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यपध्द्ती-

 • रक्कम रु. 5.00 कोटीपर्यंत किंमतीच्या योजना- जिल्हा व्यवस्थापन समिती, जिल्हा परिषद शासन निर्णय ग्रापाधो -1213/प्रक्र95/पापु-07 दि. 16/07/2013
 • रक्कम रु. 5.00 कोटीपेक्षा जास्त किंमतीच्या योजना- शासनस्तरावरुन मान्यता व दरडोई खर्चाच्या निकषामध्ये न बसणा-या सर्व योजना शासनाकडे निर्णयार्थ पाठविण्यात याव्यात.

योजनांना तांत्रिक मंजुरीचे अधिकार पुढीलप्रमाणे आहेत-

 • रक्कम रु. 50.00 लाखापर्यंत योजना- कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद
 • रक्कम रु. 50.00 लाख ते रु. 2.5 कोटीपर्यंत किंमतीच्या योजना- विभागीय अधिक्षक अभियंता (NRDWP)
 • रक्कम रु. 2.5 ते 5.00 कोटीपर्यंत योजना- मुख्य अभियंता, राज्य पाणी पुरवठा व स्वच्छता संस्था
 • रक्कम रु. 5.00 कोटीवरील योजना- सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

योजनांची अंमलबजावणी कार्यपध्द्ती-

 • रक्कम रु. 50.00 लाखापर्यंतच्या योजना- अंमलबजावणी व देखभाल दुरुस्ती ग्रामपंचायत / ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समित्या.
 • रक्कम रु. 50.00 लाख ते 2.5 कोटीपर्यंतच्या योजना- अंमलबजावणी ग्रामपंचायत/ ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती करील व पुर्ण झाल्यावर किमान एक वर्षापर्यंत योजना ठेकेदारामार्फत चालविणे बाबतची अट निविदा करारनाम्यात समाविष्ट करावी.
 • रक्कम रु. 5.00 कोटीपर्यंतच्या प्रादेशिक नळ योजना- अंमलबजावणी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात यावी. देखभाल व दुरुस्तीचे काम किमान एक वर्ष करेल ह्याबाबत अट करारनाम्यात करावी व त्यानंतर ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या शिखर समितीमार्फत जिल्हा परिषदेच्या सहाय्याने करण्यात येईल.
 • रक्कम रु. 5.00 कोटीहून अधिक किंमतीच्या स्वतंत्र योजनांची अंमलबजावणी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणामार्फत ग्रामपंचायत / स्वच्छता समितीच्या नियंत्रणाखाली करण्यात येईल व किमान 1 वर्षापर्यंत ठेकेदारामार्फत चालवून ती योजना ग्रामपंचायतीकडे देखभाल दुरुस्तीसाठी व हस्तांतरीत होईल.
 • रक्कम रु. 5.00 कोटीहून अधिक किंमतीच्या प्रादेशिक योजनांची अंमलबजावणी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणामार्फत ग्रामपंचायत / स्वच्छता समितीच्या नियंत्रणाखाली करण्यात येईल व किमान 1 वर्षापर्यंत ठेकेदारामार्फत चालवून ती योजना ग्रामपंचायतीकडे देखभाल दुरुस्तीसाठी व हस्तांतरीत होईल.

तांत्रिक सहाय्य व सनियंत्रण-

 • रक्कम रु. 5.00 कोटीपर्यंतच्या पिण्याच्या पाणी पुरवठा योजनांची अंमलबजावणी तांत्रिकदृष्ट्या योग्य होईल याची जबाबदारी जिल्हा परिषदेमार्फत करण्यात यावी.
 • ग्रामपंचायतीकडुन राबविण्यात येणा-या योजनांची अंदाजपत्रके, आराखडे तयार करणे, योजनांचे पर्यवेक्षण करणे हि कामे जिल्हा परिषदांकडील नियमीत व कंत्राटी अभियंत्यांमार्फत पार पाडण्यात येतील.

योजनांचे नियोजन व कार्यान्वयनाची कार्यपध्द्ती-

 • केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार प्रस्तावित उपाययोजनांच्या सुक्ष्म नियोजनाअंती दरवर्षी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्यात यावा व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
 • अंदाजपत्रकासाठी 2 टक्के, देखरेखीसाठी 5 टक्के, तसेच प्रशासकीय खर्चासाठी 2 टक्के अशी एकुण 9 टक्के विशेष तरतुद राहील.
 • सदर कृती आराखडा कोणत्याही परिस्थितीत दरवर्षी या शासन निर्णयातील परिच्छेद 11 मधील वेळापत्रकाप्रमाणे तयार करण्यात यावा.
 • मासिक पाणी पट्टीचादर निश्चित करतांना मूळ व्यवस्था व नव्याने होणारी व्यवस्था यामधील दरांची सरासरी विचारात घेवून पाणी पट्टीची रक्कम निश्चित करावी.
 • 40 लिटर किंवा त्यापेक्षा जास्त दरडोई दरदिवशी पाणी पुरवठ्यासाठी शासनाचा 90 टक्के तर गावचा 10 टक्के लोकवर्गणी स्वरुपात सहभाग राहिल. तसेच अनुसूचित जाती जमाती करीता शासनाचा 95 टक्के तर गावचा 5 टक्के लोकवर्गाणी स्वरुपात सहभाग राहील.
 • भुजल पुनर्भरण करुन स्त्रोत बळकटीकरीता स्वतंत्ररित्या घेतलेल्या रक्कम रु. 10.00 लाखापर्यंतच्या योजनांना लोक वर्गणीची अट लागू राहणार नाही.
 • ग्रामसभेला एकुण मतदारांच्या संख्येच्या किमान 25% उपस्थिती अनिवार्य राहील.
 • राज्यात यापुढे नव्याने मंजुर करावयाच्या नळ पाणी पुरवठा योजना नियोजन, अंमलबजावणी व बहिर्गमन अशा टप्प्यात राबविण्यात याव्यात.
 • ग्रामपंचायतीने ग्रामसभेद्वारे ठराव करुन नळ पाणी पुरवठा योजनेची मागणी व पाणी पुरवठा व स्वच्छता समिती गठीत करुन बँकेत बचत खाते उघडून लाभधारकांकडुन लोक वर्गणी जमा करणे, भूवैज्ञानिक यांचेमार्फत उद्भव निश्चित करणे, अंदाजपत्रके, आराखडे जिल्हा परिषदेमार्फत करुन घेणे, सामाजिक लेखा परिक्षण समिती, महिला समिती स्थापन करणे. नळ पाणी पुरवठा योजनेचे विविध पर्याय निवडुन किमान खर्चाची योजना अंतिम करणे, टाकी, विहीर इ. जागांची बक्षिस पत्रे नोंदणीकृत करणे. अंदाजपत्रके व आराखडे तयार करणे इ. बाबी संबंधित ग्रामपंचायत / पाणी पुरवठा स्वच्छता समितीने ग्रामसभेद्वारा करण्याच्या आहेत.

ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती-

ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती ही मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 49 नुसार बनलेली प्रकल्पातील प्रमुख समिती आहे. प्रकल्पाची आखणी, नियोजन, अंमलबजावणी व देखभाल - दुरुस्ती करण्याची जबाबदारी या समितीची आहे.

समितीची रचना-

 • सदर समितीची निवड ग्रामसभेमधुन केली जाईल.
 • सदर समितीचे अध्यक्ष व सचिव यांची निवड ग्रामपंचायतीचे ग्राम सभेमधुन केली जाईल.
 • या समितीमध्ये किमान 12 सदस्य, जास्तीत जास्त 24 सदस्य असतील.
 • त्यातील किमान 1/3 सदस्य ग्रामपंचायत सदस्यांतून निवडलेले असतील.
 • या समितीत 50 टक्के महिला सदस्यांचा समावेश असेल.
 • गावपातळीवरील महिला मंडळ, युवा मंडळ, भजनी मंडळ, महिला बचत गट, सहकारी संस्था इ. चे प्रतिनीधीत्व असेल.
 • ग्रामस्तरीय शासकीय / जि.प./ ग्रा.पं./ कर्मचा-यांची आमंत्रित व सहकारी सदस्य म्हणून निवड करता येईल, पण त्यांना मतदानाचा अधिकार नसेल.
 • 30 टक्के मागासवर्गीय असतील.
 • प्रत्येक वॉर्ड किंवा वस्तीतील किमान एक प्रतिनीधी सदस्य म्हणून असेल.

सामाजिक लेखा परिक्षण समिती-

दिनांक 26 जानेवारी रोजी होणा-या ग्रामसभेमधून सदरची समिती गठित करणेची आहे. अपरिहार्य कारणास्तव दिनांक 26 जानेवारी रोजी ग्रामसभा झाली नाही तर पुढील ग्रामसभेत समिती गठित करावी.

समितीची रचना-

 • सदर समितीमध्ये एकुण जास्तीत जास्त 9 सदस्य राहतील.
 • यापैकी 1/3 महिला सदस्यांचा समावेश असावा.
 • ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीमध्ये अंतर्भुत नसणा-या सदस्यांपैकी 2 सदस्यांची निवड या समितीवरती करावी. निवड करावयाच्या ग्रामपंचायत सदस्यांची शैक्षणिक अर्हता किमान एसएससी असावी व त्यांना हिशोबाची तसेच लेखापरिक्षणाची जाण असावी.
 • गावातील महिला मंडळामधील ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीवर नसलेल्या 1 महिला सदस्याची या समितीवर नियुक्ती करावी. निवड करावयाच्या महिला सदस्याची शैक्षणिक अर्हता किमान एसएससी असावी व त्यांना हिशोबाची तसेच लेखापरिक्षणाची जाण असावी.
 • गावातील शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक / प्राध्यापक यामधून कमाल 2 प्रतिनीधींची या समितीवर निवड करावी.
 • गावातील अथवा परिसरातील सेवाभावी संस्थेमधील 1 प्रतिनीधीची नियुक्ती समितीवर करावी.
 • गावातील सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी ज्यांना हिशोबाचे व लेखा परिक्षणाचे ज्ञान आहे, अशा एका सेवा निवृत्त अधिका-याची / कर्मचा-याची नियुक्ती या समितीवर करावी.
 • गावातील युवामंडळ, राष्ट्रीय साक्षरता अभियानामधील किमान पद्वीधर प्रतिनीधी समितीवर घ्यावा. बी. कॉम. असणा-यांना प्राधान्य देण्यात यावे.

नळ पाणी पुरवठा योजनेचे लेखे

ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने पाणी पुरवठ्या संदर्भात जमा / खर्चाचे हिशोब ठेवण्याची जबाबदारी समिती सदस्यांमधील एका व्यक्तीवर सोपविण्याची आहे. या सदस्याने खालीलप्रमाणे सर्व आर्थिक व्यवहाराचे लेखे अद्ययावत ठेवावयाचे आहेत.

 • पावती पुस्तक नमुना नंबर 7 मधील.
 • लोकवर्गणी जमेची नोंदवही.
 • पाणी पट्टी वसुली नोंदवही (मागणी व वसुली).
 • कॅशबुक.
 • खतावणी.
 • साठा नोंदवही.
 • मोजमाप पुस्तक.

निविदा कार्यपध्द्ती-

ग्रामसभेच्या मान्यतेनुसार गाव पातळीवर ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने तात्काळ करावयाची आहे.

निविदा कार्यवाही-

शासन निर्णय क्र. ग्रापाधो /प्रक्र 185/पापु 07/ दि. 26/03/2013 अन्वये रु 1 लक्ष पेक्षा जास्त किंमतीच्या साहित्यांची / वस्तुची खरेदी व रु 5 लक्ष व त्यापेक्षा अधिक मुल्य किंमतीच्या कामाचे वाटप ई-निविदा कार्यप्रणालीचा अवलंब करण्याचे आदेश आहेत.

 • नळ पाणी पुरवठा योजनेचे काम ग्राम पंचायतीस त्यांचे उत्पन्नाचे आधारावर रु. 15.00 लाखापर्यंत देता येईल. त्यासाठी ग्राम पंचायत आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेबाबतचे प्रमाणपत्र गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेकडुन उपलब्ध करुन घ्यावे.
 1. रु. 30,000/- पर्यंत वार्षिक उत्पन्न असणा-या ग्राम पंचायतीला रु. 5.00लक्ष.
 2. रु. 30,001/- च्या पुढे वार्षि क उत्पन्न असणा-या ग्राम पंचायतींना रु.10.00 लक्ष
 3. रु. 50,001/- च्या पुढे वार्षि क उत्पन्न असणा-या ग्राम पंचायतींना रु.15.00 लक्ष पर्यंतची कामे देण्यात यावीत.
 • नळ पाणी पुरवठा योजनेचे काम रु.15.00 लक्ष पर्यंतचे असेल तर ते काम मंजुर सहकारी संस्थेस देता येते. त्यासाठी मंजुर सहकारी संस्था ही जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था मर्या., साखर संकुल, नरवीर तानाजीवाडी, पुणे 5 व अध्यक्ष, पुणे जिल्हा मंजुर सहकारी संस्था फेडरेशन लि. प्लॉट नं. 656, 657, मार्केटयार्ड, लेबर फेडरेशन बिल्डींग, गुलटेकडी, पुणे 37 यांना पत्र पाठवून त्यांचे कडुन मंजुर सहकारी संस्थेचे नांव प्राप्त करुन घ्यावे. त्यांचेकडुन प्राप्त झालेल्या मंजुर संस्थेसच काम द्यावे.
 • ग्राम पंचायत किंवा मंजुर सहकारी संस्थेस काम अंदाजपत्रकीय दरानेच द्यावयास पाहिजे.
 • ग्राम पंचायत किंवा मंजुर सहकारी संस्था यांचेकडुन नियमानुसार निविदा फॉर्म भरुन घेणे, अनामत रक्कम भरणा करुन घेणे, करारनामा स्टॅम्पपेपरवर (अनामत रक्मेच्या 3 टक्के रक्मेच्या स्टॅम्प पेपरवर) करुन घेणे हि कार्यवाही अध्यक्ष/सचिव, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती यांनी करावयाची आहे.

योजनांचे नियोजन व कार्यान्वयनाचे टप्पे-

योजनेची मागणी व त्यापुढील कार्यवाहीचे वेळापत्रक-

पुणे जिल्हा परिषद, पुणे

ग्रामीण पाणी पुरवठा बांधकाम विभाग

आर्थिक वर्ष 2009-2010 पासुन केंद्र शासनाने भारत निर्माण कार्यक्रमाचे रुपांतर राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम असे केले आहे. सदर कार्यक्रमांतर्गत खालील लेखा शिर्षांमधुन पाणी पुरवठ्याची कामे प्रगतीपथावर आहेत.

सन 2013-14 मधील तालुकानिहाय उद्दीष्ट व माहे सप्टेंबर 2013 अखेर साध्य

सा. आ. स्थापत्य बिगर आदिवासी-

सन 2012-13 मधील अखर्चित रक्कम रु 492.22 लक्ष व सन 2013-2014 या वर्षाकरीता सदर लेखा शिर्षांतर्गत रक्कम रु. 1920.30 लक्ष निधी माहे सप्टेंबर 2013 अखेर प्राप्त झाला असुन एकुण रक्कम रु. 2412.52 लक्ष इतका निधी उपलब्ध असुन माहे सप्टेंबर 2013 अखेर 424.26 लक्ष इतका निधी खर्च करण्यात आला आहे. या लेखा शिर्षांतर्गत एकुण 124 नळ पाणी पुरवठा योजनेची कामे हाती घेण्यात आली असुन त्यापैकी माहे सप्टेंबर 2013 अखेर 22 नळ पाणी पुरवठा योजनेची कामे पुर्ण झाली आहेत 100 नळ पाणी पुरवठा योजनेची कामे प्रगतीपथावर आहेत. व 2 नळ पाणी पुरवठा योजनेची कामे अद्याप हाती घेण्यात आली नाही.

सन 2013-2014 या वर्षाकरीता रक्कम रु. 3671.10 लक्ष इतका नियतव्यय मंजुर आहे.

सा. आ. स्थापत्य आदिवासी-

सन 2012-13 मधील अखर्चित रक्कम रु 49.73 लक्ष व सन 2013-2014 या वर्षाकरीता सदर लेखा शिर्षांतर्गत माहे सप्टेंबर 2013 अखेर प्राप्त झाला नसुन एकुण रक्कम रु. 49.73 लक्ष इतका अखर्चित निधी उपलब्ध असुन माहे सप्टेंबर 2013 अखेर निधी खर्च करण्यात आला नाही. या लेखा शिर्षांतर्गत एकुण 3 नळ पाणी पुरवठा योजनेची कामे हाती घेण्यात आली असुन सर्व कामे प्रगतीपथावर आहेत.

सन 2013-2014 या वर्षाकरीता रक्कम रु. 90.50 लक्ष इतका नियतव्यय मंजुर आहे.

आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील (OTSP)-

सन 2012-13 मधील अखर्चित रक्कम रु 17.00 लक्ष व सन 2013-2014 या वर्षाकरीता सदर लेखा शिर्षांतर्गत माहे सप्टेंबर 2013 अखेर प्राप्त झाला नसुन एकुण रक्कम रु. 17.00 लक्ष इतका निधी उपलब्ध असुन माहे सप्टेंबर 2013 अखेर 10.56 लक्ष इतका निधी खर्च करण्यात आला आहे.

सन 2013-2014 या वर्षाकरीता रक्कम रु. 50.00 लक्ष इतका नियतव्यय मंजुर आहे.

वर्धीतवेग कार्यक्रम (ARP)-

सन 2012-13 मधील अखर्चित रक्कम रु 142.59 लक्ष व सन 2013-2014 या वर्षाकरीता सदर लेखा शिर्षांतर्गत रक्कम रु. 1000.00 लक्ष निधी माहे सप्टेंबर 2013 अखेर प्राप्त झाला असुन एकुण रक्कम रु. 1142.59 लक्ष इतका निधी उपलब्ध असुन माहे सप्टेंबर 2013 अखेर 1044.34 लक्ष इतका निधी खर्च करण्यात आला आहे. या लेखा शिर्षांतर्गत एकुण 92 नळ पाणी पुरवठा योजनेची कामे हाती घेण्यात आली असुन त्यापैकी माहे सप्टेंबर 2013 अखेर 10 नळ पाणी पुरवठा योजनेची कामे पुर्ण झाली आहेत. 65 नळ पाणी पुरवठा योजनेची कामे प्रगतीपथावर आहेत. व 17 नळ पाणी पुरवठा योजनेची कामे अद्याप हाती घेण्यात आली नाही.

भारत निर्माण कार्यक्रम-

सन 2012-13 मधील अखर्चित रक्कम रु 75.72 लक्ष व सन 2013-2014 या वर्षाकरीता सदर लेखा शिर्षांतर्गत रक्कम रु. 500.00 लक्ष निधी माहे सप्टेंबर 2013 अखेर प्राप्त झाला असुन एकुण रक्कम रु. 575.72 लक्ष इतका निधी उपलब्ध असुन माहे सप्टेंबर 2013 अखेर 290.39 लक्ष इतका निधी खर्च करण्यात आला आहे. या लेखा शिर्षांतर्गत एकुण 36 नळ पाणी पुरवठा योजनेची कामे हाती घेण्यात आली असुन त्यापैकी माहे सप्टेंबर 2013 अखेर 16 नळ पाणी पुरवठा योजनेची कामे पुर्ण झाली आहेत 20 नळ पाणी पुरवठा योजनेची कामे प्रगतीपथावर आहेत.

दुषित पाण्याखालील गावे-

सन 2013-15 मध्ये दुषित पाण्याखाली एकुण 20 गावांचे उद्दीष्ट असुन सन 2013-14 मध्ये एकुण 7 गावे व उर्वरीत 13 गावे सन 2014-15 मध्ये उद्दीष्ट पुर्ण करण्याचे ठरविले आहे. सदर गावांमध्ये क्षार नायट्रेट व सॅलनिटी घटक विहित मानांकनापेक्षा अधिक आढळलेले आहे.

प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना-

पुणे जिल्हा कार्यक्षेत्रात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात आलेल्या व दैनंदिन देखभाल व दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद पुणे व संबंधित योजनांमध्ये समाविष्ट गावांच्या संयुक्त समिती यांचेकडे हस्तांतरीत करण्यात आलेल्या एकुण 24 प्रादेशिक योजना आहेत. 24 योजनांपैकी 14 योजनांचे देखभाल व दुरुस्ती व्यवस्थापन जिल्हा परिषदेकडे 07 (कार्ला, मोरगांव, पाटण, पोखरी, शिवरी, बेल्हे व मुळशी ) योजना चालू असून 04 योजना मागणी अभावी बंद आहेत. उर्वरीत 13 योजना संबंधित गावांच्या संयुक्त समित्यांमार्फत चालविणेत येत आहे.

सदर योजनांना पाणी पट्टीचे दर माहे 2010 पासुन लागु- रु 13/- प्रति 1000 लिटर खाजगी नळ जोड.

 • कार्ला प्रा (82) = 1/2 ध दर रु 13/- प्रति 1000 ली मिटर व्दारे
 • मुळशी प्रा (220) = 1/2 ध दर रु 1536/- वार्षिक मिटर नाही.

व्यवसायिक 1/2 ध दर रू 3072/- वार्षिक 1 ध दर रु. 7524/- वार्षिक

यांत्रिकी उपविभाग

 • दुहेरी पंपावर आधारित (Dual Pump System) शाश्वत ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजना

महाराष्ट्रामध्ये 85 % ग्रामीण पाणी पुरवठा हा भूजलावर अवलंबून असल्याने व्ंाधिन विहिरीवरील हातपंप हा महत्वाचा घटक आहे. योजनेचा देखभाल दुरूस्ती, विद्युत जोडणी व विज देयकांचा खर्च विचारात घेता लहान वाडया वस्त्यांवर नळ पाणी पुरवठा योजनांची अंमलबजावणी आर्थिक दृष्टया शक्य होत नाही. विभागाने पर्याय म्हणुन 2009-10 पासुन लहान वाडया वस्त्यांसाठी कमी खर्चाची दुहेरी पंपावर आधारित शाश्वत ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजना राबविणेस सुरुवात केली. या योजनेसाठी अंदाजे 2.50 लक्ष पर्यंत खर्च येतो. सदर योजनेसाठी 10 % लोकवर्गणीची अट आहे. यामध्ये अस्तित्वातील उच्च क्षमतेच्या (किमान 2800 ली प्रति तास) विंधन विहिरीवर हातपंपासोबत कमी अश्वशक्तीचा सिंगल फेज पाणबुडी पंप बसवुन 5000 ली क्षमतेच्या टाकीत पाणी साठवुन नळाव्दारे पाणी पुरवठा करण्यात येतो. विजपंपाव्दारे पाण्याचा उपसा होणार असल्याने पाण्याचा स्त्रोत व योजना शाश्वत राहण्यासाठी पावसाळयामध्ये विंधन विहिरींचे पुर्न:भरण करण्यात येते.

योजनेची वैशिष्टये -

 • वीज भारनियमन काळात तसेच विद्युतपंप नादुरूस्त झाल्यास हातपंपाव्दारे पाणी पुरवठा
 • हातपंप नादुरुस्त झाल्यास विद्युत पंपाव्दारे पाणी पुरवठा
 • नळ पाणी पुरवठा योजनांचे तुलनेने देखभाल दुरुस्ती व अंमलबजावणीसाठी कमी खर्च येतो.

सौर ऊर्जा पंपाचा (Solar Pump) वापर करून विंधन विहिरीवर आधारित लघु नळ पाणी पुरवठा योजना -

भौगोलिक परिस्थितीमुळे वीज पुरवठा घेणे आर्थिक दृष्टया किफायतशीर नसलेल्या व केवळ विंधन विहिरींवर अवलंबुन असलेल्या गाव/वाडया/वस्त्यांवा सौर ऊर्जा पंपाचा वापर करुन लघु नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात येते. अस्तित्वातील उच्च क्षमतेच्या विंधन विहिरींवर सौर ऊर्जेवरील 750 ते 900 वॅट चा ए.सी./डी.सी पंप संच हातपंपासह बसविण्यात येतो. या पंपासाठी आवश्यक सौर पॅनल्स ऑटो ट्रकींग व्यवस्थेसह आणि सुरक्षेसाठी लोखंडी जाळीसह विंधन विहिरीनजीक उभारणी करण्यात येतात. सौर पंपाने उपसा करून 5000 लि. क्षमतेच्या टाकीमध्ये पाणी साठविण्यात येऊन नळाव्दारे पाणी पुरवठा करण्यात येतो. या योजनेसाठी अंदाजे 5.00 लक्ष पर्यंत खर्च येतो. सदर योजनेसाठी 10 % लोकवर्गणीची अट आहे.

 • हातपंप देखभाल व दुरुस्ती योजना -

जिल्हयात 11315 हातपंप कार्यान्वित असुन देखभाल दुरूस्तीसाठी प्रत्येक तालुक्यांमध्ये संंबंधित गट विकास अधिकारी यांचे नियंत्रणाखाली पथक नेमण्यात आलेले आहे. यासाठी विभागाकडे 12 वाहने उपलब्ध आहेत. हातपंप / वीज पंप देखभाल व दुरूस्तीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीकडून वार्षिक 1 हजार
रुपये वर्गणी वसुल करुन जिल्हा परिषद देखभाल व दुरुस्ती निधित जमा केली जाते. योजनेकडील कर्मचारी वर्गाचे वेतन व भत्ते , वाहनांसाठी इंधन पुरवठा व दुरूस्ती, हातपंप दुरुस्तीसाठी आवश्यक असणारे सुटे भाग पाईप व इतर साहित्य यासाठी लागणारा सर्व खर्च जिल्हा परिषदेच्या देखभाल व दुरुस्ती निधीमधुन भागविला जातो.

 • विंधनविहिर पुनरुजीवन कार्यक्रम -

बहुतांश वेळा विंधन विहिरीमध्ये दगड माती , पाईप पडल्याने अथवा झाडांच्या मुळया वाढल्याने बुजल्या जातात. अशा विंधन विहिरींचे ब्लांस्टींग युनिट, इनवेल रिंग मशीनव्दारे पुनरुजीवन केले जाते. या योजनेसाठी 10% लोकवर्गणी (रु 600) भरावी लागते.

 • विंधन विहिर कार्यक्रम -

मा जिल्हाधिकारी यांचे मान्यतेने टंचाईग्रस्त भागात विंधन विहिरी घेण्यात येतात. तसेच जिल्हा निधी मधुनही विंधन विहिरी घेण्यात येतात.

 • ब्लास्टिंग योजना -

खाजगी व शासकिय लाभार्थिच्या मागणी प्रमाणे विहिर खोल करणे, रस्ते , सार्वजनिक विहिर , पाझर तलाव, बंधारे तसेच झाडे लावण्यासाठी खड्डे खोदण्यासाठी ब्लास्टिंगची कामे केली जातात. याकामांचा प्रति सुरुंग छिद्र शासकिय दर रु. 45/- आहे.

हातपंपाचे कट्टे नविन करणे

सन 2013-14 या वर्षामध्ये जिल्हा परिषदेने हातपंपाचे खराब झालेले कट्टे नविन करणे या योजनेसाठी 25.00 लक्ष तरतुद प्रस्तावित असुन या योजने अंतर्गत 334 हातपंपाचे कट्टे नविन करण्यात येणार आहेत. तसेच टंचाई विंधन विहिर विशेष दुरूस्ती अंतर्गत कट्टे दुरुस्ती , हातपंप सेट बदलणे इ. उपाय योजना करण्यात येत आहेत.

संपर्क -

ग्रामस्तरावर - ग्रामसेवक

तालुकास्तरावर - गट विकास अधिकारी

जिल्हास्तरावर - उप अभियंता, यांत्रिकी उपविभाग

भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणा

१) दुहेरी पंपावर आधारित(Dual Pump System) शाश्वत ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजना -

महाराष्ट्रामध्ये ८५ % ग्रामीण पाणी पुरवठा हा भूजलावर अवलंबून असल्याने विंधन विहिरीवरील हातपंप हा महत्वाचा घटक आहे. योजनेचा देखभाल दुरुस्ती, विद्युत जोडणी व वीज देयकांचा खर्च विचारात घेता लहान वाडया वस्त्यांवर नळ पाणी पुरवठा योजनांची अंमलबजावणी आर्थिक दृष्टया शक्य होत नाही. विभागाने पर्याय म्हणून २००९-२०१० पासून लहान वाडया वस्त्यांसाठी कमी खर्चाची दुहेरी पंपावर आधारित शाश्वत ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजना राबविणेस सुरुवात केली. या योजनेसाठी अंदाजे र. रु. २.५ लक्ष पर्यंत खर्च येतो. यामध्ये अस्तित्वातील उच्च क्षमतेच्या (किमान २८०० लि. प्रति तास) विंधन विहिरीवर हातपंपासोबत कमी अश्वशक्तीचा सिंगलफेज पाणबुडी पंप बसवून ५००० लि. क्षमतेच्या टाकीत पाणी साठवून नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. विजपंपाद्वारे पाण्याचा उपसा होणार असल्याने पाण्याचा स्त्रोत व योजना शाश्वत राहण्यासाठी पावसाळयामध्ये विंधन विहिरींचे पुर्नःभरण करण्यात येते.

योजनेची वैशिष्टये -

 • वीज भारनियमन काळात तसेच विद्युतपंप नादुरुस्त झाल्यास हातपंपाद्वारे पाणी पुरवठा.
 • हातपंप नादुरुस्त झाल्यास विद्युत पंपाद्वारे पाणी पुरवठा.
 • नळ पाणी पुरवठा योजनांचे तुलनेने देखभाल दुरुस्ती व अंमलबजावणीसाठी कमी खर्च येतो.

२) सौर ऊर्जा पंपाचा (Solar Pump) वापर करुन विंधन विहिरीवर आधारित लघु नळ पाणी पुरवठा योजना -

भौगोलिक परिस्थितीमुळे वीज पुरवठा घेणे आर्थिक दृष्टया किफायतशीर नसलेल्या व केवळ विंधन विहिरींवर अवलंबून असलेल्या गाव/वाडया/वस्त्यांवर सौर ऊर्जा पंपाचा वापर करुन लघु नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात येते. अस्तित्वातील उच्च क्षमतेच्या विंधन विहिरींवर सौर ऊर्जेवरील ७५० ते ९०० वॅट चा ए.सी /डी. सी पंप संच हातपंपासह बसविण्यात येतो. या पंपासाठी आवश्यक सौर पॅनल्स्‌ऑटो ट्रॅकींग व्यवस्थेसह आणि सुरक्षेसाठी लोखंडी जाळीसह विंधन विहिरीनजीक उभारणी करण्यात येतात. सौर पंपाने उपसा करुन ५००० लि. क्षमतेच्या टाकीमध्ये पाणी साठविण्यात येऊन नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो.

३) हातपंप देखभाल व दुरुस्ती योजना -

जिल्हयात ११३१५ हातपंप कार्यान्वित असून हातपंप देखभाल व दुरुस्तीसाठी प्रत्येक तालुक्यामध्ये संबंधित गट विकास अधिकारी यांचे नियंत्रणाखाली पथक नेमण्यात आलेले आहे. यासाठी विभागाकडे १२ वाहने उपलब्ध आहेत.

 • हातपंप/वीजपंप देखभाल व दुरुस्तीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीकडून वार्षिक १ हजार रुपये वर्गणी वसूल करुन जिल्हा परिषद देखभाल व दुरुस्ती निधीत जमा केली जाते.
 • योजनेकडील कर्मचारी वर्गाचे वेतन व भत्ते, वाहनांसाठी इंधन पुरवठा व दुरुस्ती, हातपंप दुरुस्तीसाठी आवश्यक असणारे सुटे-भाग, पाईप व इतर साहित्य यासाठी लागणारा सर्व खर्च जिल्हा परिषदेच्या देखभाल व दुरुस्ती निधीमधून भागविला जातो.

४) विंधन विहीर पुनरूज्जीवन कार्यक्रम -

बहुतांश वेळा विंधन विहिरींमध्ये दगड माती, पाईप पडल्याने अथवा झाडांच्या मुळया वाढल्याने बुजल्या जातात. अशा विंधन विहिरींचे ब्लांस्टींग युनिट, इनवेल रिंग मशीन द्वारे पुनरुजीवन केले जाते. या योजनेसाठी १०% लोकवर्गणी (रु. ६००) भरावी लागते.

५) विंधन विहिर कार्यक्रम -

मा.जिल्हाधिकारी यांचे मान्यतेने टंचाईग्रस्त भागात विंधन विहिरी घेण्यात येतात. तसेच वित्त आयोग निधी मधूनही विंधन विहिरी घेण्यात येतात.

६) ब्लास्टिंग योजना -

खाजगी अथवा शासकीय लाभार्थींच्या मागणी प्रमाणे विहिर खोल करणे, रस्ते, सार्वजनिक विहीरी, पाझर तलाव, बंधारे तसेच झाडे लावण्यासाठी खड्डे खोदण्यासाठी ब्लास्टिंगची कामे केली जातात. याकामांचा प्रति सुरूंग छिद्ग शासकीय दर रु. ४५/- आहे.

७) हातपंपाचे कट्टे नवीन करणे -

सन २०१०-२०११ या वर्षामध्ये जिल्हा परिषदेने हातपंपाचे खराब झालेले कट्टे नवीन करणे या योजनेसाठी र.रु. १० लक्ष तरतूद प्रस्तावित असुन या योजने अंतर्गत २०० हातपंपाचे कट्टे नवीन करण्यात येणार आहेत. तसेच टंचाई विंधन विहिर विशेष दुरुस्ती अंतर्गत कट्टे दुरुस्ती, हातपंप सेट बदलणे इ. उपाय योजना करण्यात येत आहेत.

संपर्क -

ग्राम स्तरावर - ग्रामसेवक

तालुका स्तरावर - गट विकास अधिकारी

जिल्हा स्तरावर - उप अभियंता, भूजल सर्व्हेक्षण विकास यंत्रणा यांत्रिकी उप विभाग)

उप अभियंता (यां),उप विभाग,जिल्हा परिषद,पुणे

यशोगाथा

सौर उर्जेवर आधारीत दुहेरी लघु न.पा.पु.योजना


गावाचे नांव-वेळवंड, (पाटीलवस्ती),ता.भोर,जि.पुणे.

 • लोकसंख्या - १००
 • घरांची संख्या - ११
 • उपलब्ध स्त्रोतांची संख्या - हातपंप
 • योजनेवर झालेला खर्च - ५४९१००/-
 • वर्ष - सन २०१२-१३

थोडक्यात तपशील

ऐन उन्हाळयात निर्माण होणा-या तीव्र टंचाई काळात सदर योजनेव्दारे पिण्याचे पाण्याची १००% सोय झालेली असलेने टँकरची आवश्यकता भासण्याची गरज नाही. सदा गावामध्ये सौर उर्जेवर आधारीत दुहेरी पंप योजना राबविणेपूर्वी १ हातपंपांवर पाणी पुरवठा होत असे.ऐन उन्हाळयात विंधन विहीरींची पाण्याची पातळी १२० फूटाचे खाली गेलेवर थांबून थांबून पाणी पुरवठा होत असलेने, बराच वेळ पिण्याचे पाण्यासाठी लागत होता. सदर योजनेस १८०फूटाची पाईप लाईन असलेने आता,पुरेसे पाणी मिळत असून,सदरचा दुहेरीपंप २४ ७ काळ चालतो.

भोर तालुका अति डोंगराळ भाग असलेले,या भागात पावसाळी पीक फक्त तांदुळ होत असलेने शेतकरी हा शेतीच्या कामात पूर्णतः अडकलेला असलेने योजना होणेपूर्वी पिण्याचे पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असे.सदर वस्तीचे अंतर स्त्रोतापासून दूरवर असलेने या योजनेमुळे प्रत्येक घरात नळ कनेक्शन देणेत आलेले आहे व प्रत्येक घरात नळ कनेक्शन दिलेने आता पाण्यासाठी भटकंती साठी लागणारा वेळ शेतातील कामात उपयोगी पडतो.असे ग्रामस्थ सांगतात.

सदर योजना ही सौर उर्जेवर आधारीत असलेने कायम स्वरुपी विजेच्या खर्चात प्रती माणसो प्रती महीना रु.६.५० असे एकूण प्रति महीन्याचे ६५० रु. ची र् बचत झालेली आहे.

उप अभियंता (यां),उप विभाग,जिल्हा परिषद,पुणे

यशोगाथा

सौर उर्जेवर आधारीत दुहेरी लघु न.पा.पु.योजना


गावाचे नांव- नांदघूर,गावठाण, ता.भोर,जि.पुणे.

 • लोकसंख्या - २५०
 • घरांची संख्या - ६०
 • उपलब्ध स्त्रोतांची संख्या - हातपंप
 • योजनेवर झालेला खर्च - ५५४७६४/-
 • वर्ष - सन २०१२-१३

थोडक्यात तपशील

ऐन उन्हाळयात निर्माण होणा-या तीव्र टंचाई काळात सदर योजनेव्दारे पिण्याचे पाण्याची १००% सोय झालेली असलेने टँकरची आवश्यकता भासण्याची गरज नाही. सदा गावामध्ये सौर उर्जेवर आधारीत दुहेरी पंप योजना राबविणेपूर्वी १ हातपंपांवर पाणी पुरवठा होत असे.ऐन उन्हाळयात विंधन विहीरींची पाण्याची पातळी १२० फूटाचे खाली गेलेवर थांबून थांबून पाणी पुरवठा होत असलेने, बराच वेळ पिण्याचे पाण्यासाठी लागत होता. सदर योजनेस १८०फूटाची पाईप लाईन असलेने आता,पुरेसे पाणी मिळत असून,सदरचा दुहेरीपंप २४ ७ काळ चालतो.

भोर तालुका अति डोंगराळ भाग असलेले,या भागात पावसाळी पीक फक्त तांदुळ होत असलेने शेतकरी हा शेतीच्या कामात पूर्णतः अडकलेला असलेने योजना होणेपूर्वी पिण्याचे पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असे.सदर वस्तीचे अंतर स्त्रोतापासून दूरवर असलेने या योजनेमुळे प्रत्येक घरात नळ कनेक्शन देणेत आलेले आहे व प्रत्येक घरात नळ कनेक्शन दिलेने आता पाण्यासाठी भटकंती साठी लागणारा वेळ शेतातील कामात उपयोगी पडतो.असे ग्रामस्थ सांगतात. सदर योजना ही सौर उर्जेवर आधारीत असलेने कायम स्वरुपी विजेच्या खर्चात प्रती माणसो प्रती महीना रु.६.५० असे एकूण प्रति महीन्याचे १६२५ रु. ची र् बचत झालेली आहे.

उप अभियंता (यां),उप विभाग,जिल्हा परिषद,पुणे

यशोगाथा

सौर उर्जेवर आधारीत दुहेरी लघु न.पा.पु.योजना


गावाचे नांव- पांगारी ह.वस्ती (धावटमाळ),ता.भोर,जि.पुणे.

 • लोकसंख्या - १२०
 • घरांची संख्या - १५
 • उपलब्ध स्त्रोतांची संख्या - हातपंप
 • योजनेवर झालेला खर्च - ५७६६६५/-
 • वर्ष - सन २०१२-१३

थोडक्यात तपशील

ऐन उन्हाळयात निर्माण होणा-या तीव्र टंचाई काळात सदर योजनेव्दारे पिण्याचे पाण्याची १००% सोय झालेली असलेने टँकरची आवश्यकता भासण्याची गरज नाही. सदा गावामध्ये सौर उर्जेवर आधारीत दुहेरी पंप योजना राबविणेपूर्वी १ हातपंपांवर पाणी पुरवठा होत असे.ऐन उन्हाळयात विंधन विहीरींची पाण्याची पातळी १२० फूटाचे खाली गेलेवर थांबून थांबून पाणी पुरवठा होत असलेने, बराच वेळ पिण्याचे पाण्यासाठी लागत होता. सदर योजनेस १८०फूटाची पाईप लाईन असलेने आता,पुरेसे पाणी मिळत असून,सदरचा दुहेरीपंप २४ ७ काळ चालतो.

भोर तालुका अति डोंगराळ भाग असलेले,या भागात पावसाळी पीक फक्त तांदुळ होत असलेने शेतकरी हा शेतीच्या कामात पूर्णतः अडकलेला असलेने योजना होणेपूर्वी पिण्याचे पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असे.सदर वस्तीचे अंतर स्त्रोतापासून दूरवर असलेने या योजनेमुळे प्रत्येक घरात नळ कनेक्शन देणेत आलेले आहे व प्रत्येक घरात नळ कनेक्शन दिलेने आता पाण्यासाठी भटकंती साठी लागणारा वेळ शेतातील कामात उपयोगी पडतो.असे ग्रामस्थ सांगतात.

सदर योजना ही सौर उर्जेवर आधारीत असलेने कायम स्वरुपी विजेच्या खर्चात प्रती माणसो प्रती महीना रु.६.५० असे एकूण प्रति महीन्याचे ७८० रु. ची र् बचत झालेली आहे.

उप अभियंता (यां),उप विभाग,जिल्हा परिषद,पुणे

यशोगाथा

सौर उर्जेवर आधारीत दुहेरी लघु न.पा.पु.योजना


गावाचे नांव- जयतपाड,(बौध्दवस्ती),ता.भोर,जि.पुणे.

 • लोकसंख्या - १२५
 • घरांची संख्या - २०
 • उपलब्ध स्त्रोतांची संख्या - हातपंप
 • योजनेवर झालेला खर्च - ५२४६२१/-
 • वर्ष - सन २०१२-१३

थोडक्यात तपशील

ऐन उन्हाळयात निर्माण होणा-या तीव्र टंचाई काळात सदर योजनेव्दारे पिण्याचे पाण्याची १००% सोय झालेली असलेने टँकरची आवश्यकता भासण्याची गरज नाही. सदा गावामध्ये सौर उर्जेवर आधारीत दुहेरी पंप योजना राबविणेपूर्वी १ हातपंपांवर पाणी पुरवठा होत असे.ऐन उन्हाळयात विंधन विहीरींची पाण्याची पातळी १२० फूटाचे खाली गेलेवर थांबून थांबून पाणी पुरवठा होत असलेने, बराच वेळ पिण्याचे पाण्यासाठी लागत होता. सदर योजनेस १८०फूटाची पाईप लाईन असलेने आता,पुरेसे पाणी मिळत असून,सदरचा दुहेरीपंप २४ ७ काळ चालतो.

भोर तालुका अति डोंगराळ भाग असलेले,या भागात पावसाळी पीक फक्त तांदुळ होत असलेने शेतकरी हा शेतीच्या कामात पूर्णतः अडकलेला असलेने योजना होणेपूर्वी पिण्याचे पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असे.सदर वस्तीचे अंतर स्त्रोतापासून दूरवर असलेने या योजनेमुळे प्रत्येक घरात नळ कनेक्शन देणेत आलेले आहे व प्रत्येक घरात नळ कनेक्शन दिलेने आता पाण्यासाठी भटकंती साठी लागणारा वेळ शेतातील कामात उपयोगी पडतो.असे ग्रामस्थ सांगतात.

सदर योजना ही सौर उर्जेवर आधारीत असलेने कायम स्वरुपी विजेच्या खर्चात प्रती माणसो प्रती महीना रु.६.५० असे एकूण प्रति महीन्याचे ८१२ रु. ची र् बचत झालेली आहे.

उप अभियंता (यां),उप विभाग,जिल्हा परिषद,पुणे

यशोगाथा

सौर उर्जेवर आधारीत दुहेरी लघु न.पा.पु.योजना


गावाचे नांव-करंजे, (कातकरीवस्ती),ता.भोर,जि.पुणे.

 • लोकसंख्या - ३००
 • घरांची संख्या - ५०
 • उपलब्ध स्त्रोतांची संख्या - हातपंप
 • योजनेवर झालेला खर्च - ५४४६४२ /-
 • वर्ष - सन २०१२-१३

थोडक्यात तपशील

ऐन उन्हाळयात निर्माण होणा-या तीव्र टंचाई काळात सदर योजनेव्दारे पिण्याचे पाण्याची १००% सोय झालेली असलेने टँकरची आवश्यकता भासण्याची गरज नाही. सदा गावामध्ये सौर उर्जेवर आधारीत दुहेरी पंप योजना राबविणेपूर्वी १ हातपंपांवर पाणी पुरवठा होत असे.ऐन उन्हाळयात विंधन विहीरींची पाण्याची पातळी १२० फूटाचे खाली गेलेवर थांबून थांबून पाणी पुरवठा होत असलेने, बराच वेळ पिण्याचे पाण्यासाठी लागत होता. सदर योजनेस १८०फूटाची पाईप लाईन असलेने आता,पुरेसे पाणी मिळत असून,सदरचा दुहेरीपंप २४ ७ काळ चालतो.

भोर तालुका अति डोंगराळ भाग असलेले,या भागात पावसाळी पीक फक्त तांदुळ होत असलेने शेतकरी हा शेतीच्या कामात पूर्णतः अडकलेला असलेने योजना होणेपूर्वी पिण्याचे पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असे.सदर वस्तीचे अंतर स्त्रोतापासून दूरवर असलेने या योजनेमुळे प्रत्येक घरात नळ कनेक्शन देणेत आलेले आहे व प्रत्येक घरात नळ कनेक्शन दिलेने आता पाण्यासाठी भटकंती साठी लागणारा वेळ शेतातील कामात उपयोगी पडतो.असे ग्रामस्थ सांगतात. सदर योजना ही सौर उर्जेवर आधारीत असलेने कायम स्वरुपी विजेच्या खर्चात प्रती माणसो प्रती महीना रु.६.५० असे एकूण प्रति महीन्याचे १९५० रु. ची र् बचत झालेली आहे.

उप अभियंता (यां),उप विभाग,जिल्हा परिषद,पुणे

यशोगाथा

सौर उर्जेवर आधारीत दुहेरी लघु न.पा.पु.योजना


गावाचे नांव-वाढाणे, ता.बारामती ,जि.पुणे.

 • लोकसंख्या - ३५०
 • घरांची संख्या - ७०
 • उपलब्ध स्त्रोतांची संख्या - हातपंप
 • योजनेवर झालेला खर्च - ५३८३३५ /-
 • वर्ष - सन २०१२-१३

थोडक्यात तपशील

ऐन उन्हाळयात निर्माण होणा-या तीव्र टंचाई काळात सदर योजनेव्दारे पिण्याचे पाण्याची १००% सोय झालेली असलेने टँकरची आवश्यकता भासण्याची गरज नाही. सदा गावामध्ये सौर उर्जेवर आधारीत दुहेरी पंप योजना राबविणेपूर्वी १ हातपंपांवर पाणी पुरवठा होत असे.ऐन उन्हाळयात विंधन विहीरींची पाण्याची पातळी १२० फूटाचे खाली गेलेवर थांबून थांबून पाणी पुरवठा होत असलेने, बराच वेळ पिण्याचे पाण्यासाठी लागत होता. सदर योजनेस १८०फूटाची पाईप लाईन असलेने आता,पुरेसे पाणी मिळत असून,सदरचा दुहेरीपंप २४ ७ काळ चालतो.

बारामती तालुका टंचाईग्रस्त असलेले,या भागात शेतकरी हा शेतीच्या कामात पूर्णतः अडकलेला असलेने योजना होणेपूर्वी पिण्याचे पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असे.सदर वस्तीचे अंतर स्त्रोतापासून दूरवर असलेने या योजनेमुळे प्रत्येक घरात नळ कनेक्शन देणेत आलेले आहे व प्रत्येक घरात नळ कनेक्शन दिलेने आता पाण्यासाठी भटकंती साठी लागणारा वेळ शेतातील कामात उपयोगी पडतो.असे ग्रामस्थ सांगतात. सदर योजना ही सौर उर्जेवर आधारीत असलेने कायम स्वरुपी विजेच्या खर्चात प्रती माणसो प्रती महीना रु.६.५० असे एकूण प्रति महीन्याचे २२७५ रु. ची र् बचत झालेली आहे.

उप अभियंता (यां),उप विभाग,जिल्हा परिषद,पुणे

यशोगाथा

सौर उर्जेवर आधारीत दुहेरी लघु न.पा.पु.योजना


गावाचे नांव - पारवडी, ता.बारामती ,जि.पुणे.

 • लोकसंख्या - २५०
 • घरांची संख्या - ७०
 • उपलब्ध स्त्रोतांची संख्या - हातपंप
 • योजनेवर झालेला खर्च - ५११५६१ /-
 • वर्ष - सन २०१२-१३

थोडक्यात तपशील

ऐन उन्हाळयात निर्माण होणा-या तीव्र टंचाई काळात सदर योजनेव्दारे पिण्याचे पाण्याची १००% सोय झालेली असलेने टँकरची आवश्यकता भासण्याची गरज नाही. सदा गावामध्ये सौर उर्जेवर आधारीत दुहेरी पंप योजना राबविणेपूर्वी १ हातपंपांवर पाणी पुरवठा होत असे.ऐन उन्हाळयात विंधन विहीरींची पाण्याची पातळी १२० फूटाचे खाली गेलेवर थांबून थांबून पाणी पुरवठा होत असलेने, बराच वेळ पिण्याचे पाण्यासाठी लागत होता. सदर योजनेस १८०फूटाची पाईप लाईन असलेने आता,पुरेसे पाणी मिळत असून,सदरचा दुहेरीपंप २४ ७ काळ चालतो.

बारामती तालुका टंचाईग्रस्त असलेले,या भागात शेतकरी हा शेतीच्या कामात पूर्णतः अडकलेला असलेने योजना होणेपूर्वी पिण्याचे पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असे.सदर वस्तीचे अंतर स्त्रोतापासून दूरवर असलेने या योजनेमुळे प्रत्येक घरात नळ कनेक्शन देणेत आलेले आहे व प्रत्येक घरात नळ कनेक्शन दिलेने आता पाण्यासाठी भटकंती साठी लागणारा वेळ शेतातील कामात उपयोगी पडतो.असे ग्रामस्थ सांगतात.

सदर योजना ही सौर उर्जेवर आधारीत असलेने कायम स्वरुपी विजेच्या खर्चात प्रती माणसो प्रती महीना रु.६.५० असे एकूण प्रति महीन्याचे १६२५ रु. ची र् बचत झालेली आहे.

उप अभियंता (यां),उप विभाग,जिल्हा परिषद,पुणे

यशोगाथा

सौर उर्जेवर आधारीत दुहेरी लघु न.पा.पु.योजना


गावाचे नांव-बोतरवाडी(शेलारवस्ती), ता.मुळशी,जि.पुणे.

 • लोकसंख्या - १२५
 • घरांची संख्या - २०
 • उपलब्ध स्त्रोतांची संख्या - हातपंप
 • योजनेवर झालेला खर्च - ४९१३२७ /-
 • वर्ष - सन २०१२-१३

थोडक्यात तपशील

ऐन उन्हाळयात निर्माण होणा-या तीव्र टंचाई काळात सदर योजनेव्दारे पिण्याचे पाण्याची १००% सोय झालेली असलेने टँकरची आवश्यकता भासण्याची गरज नाही. सदा गावामध्ये सौर उर्जेवर आधारीत दुहेरी पंप योजना राबविणेपूर्वी १ हातपंपांवर पाणी पुरवठा होत असे.ऐन उन्हाळयात विंधन विहीरींची पाण्याची पातळी १२० फूटाचे खाली गेलेवर थांबून थांबून पाणी पुरवठा होत असलेने, बराच वेळ पिण्याचे पाण्यासाठी लागत होता. सदर योजनेस १८०फूटाची पाईप लाईन असलेने आता,पुरेसे पाणी मिळत असून,सदरचा दुहेरीपंप २४ ७ काळ चालतो.

मुळशी तालुका अति डोंगराळ भाग असलेले,या भागात पावसाळी पीक फक्त तांदुळ होत असलेने शेतकरी हा शेतीच्या कामात पूर्णतः अडकलेला असलेने योजना होणेपूर्वी पिण्याचे पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असे.सदर वस्तीचे अंतर स्त्रोतापासून दूरवर असलेने या योजनेमुळे प्रत्येक घरात नळ कनेक्शन देणेत आलेले आहे व प्रत्येक घरात नळ कनेक्शन दिलेने आता पाण्यासाठी भटकंती साठी लागणारा वेळ शेतातील कामात उपयोगी पडतो.असे ग्रामस्थ सांगतात. सदर योजना ही सौर उर्जेवर आधारीत असलेने कायम स्वरुपी विजेच्या खर्चात प्रती माणसो प्रती महीना रु.६.५० असे एकूण प्रति महीन्याचे ८१२ रु. ची र् बचत झालेली आहे.