शिक्षण विभाग (प्राथमिक)

पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत इ.1 ली ते 7 वी च्या मुलांना व मुलींना जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येते .जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे विभाग प्रमुख असून तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी हे तालुक्याचे विभाग प्रमुख असतात.इ.1 ली ते इ.7 वी च्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत केंद्रशासन पुरस्कृत व राज्यशासन पुरस्कृत अशा विविध योजना पुणे जिल्हा परिषद पुणे मार्फत राबविल्या जातात.

शिक्षण व क्रीडा समितीचा तपशील

शिक्षण समितीच्या कामासंबधी तपशीलः- शिक्षण विभागाच्या विविध योजनांना मंजुरी देणे व त्याची अंमलबजावणी बाबत पर्यवेक्षण करणे . विषय समितीच्या मासिक सभेमध्ये दरमहा येणारे विषय :-

वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या महत्वाच्या पत्रांची माहिती घेणे. सर्वांगिण शैक्षणिक गुणवत्ता वाढ विकास कार्यक्रमाचा आढावा घेणे.
शालेय पोषण आहार बाबत आढावा घेणे. पगार, पेन्शन , बजेट, ऑडीट पॉइंट बाबत आढावा घेणे.
जि.प. प्राथमिक नविन शाळांना मान्यता देणे.
जि.प. प्राथमिक शाळांमध्ये नैसर्गिक वाढीने वर्गांना मान्यता देणे. शिक्षण विभागाच्या विविध योजनांना मान्यता देणे.

पुणे जिल्हा परिषद, पुणे शिक्षण विभाग ( प्राथमिक ) योजनांची माहिती (जि.प.निधी ) सन-2013-14

  • शिक्षकदिनी शिक्षक गौरव समारंभाचे आयोजन करणे . महाराष्ट्र शासन, ग्रामविकास व जलसंधारण विभाग मंत्रालय, मुंबई यांचेकडील परिपत्रक क्रमांक संकीर्ण 1000/प्र.क्र.3241/15 दि. 12 डिसेंबर 2000 अन्वये उत्कृष्ट शिक्षकांना जिल्हा परिषद स्तरावर जिल्हा शिक्षक पुरस्कार 5 सप्टेंबर या शिक्षक दिनी देण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. भारताचे माजी राष्ट्रपती कै. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जन्मदिवशी म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्ताने शासनाचे प्रचलित धोरणानुसार जिल्हयातील गुणवंत शिक्षकांचा जिल्हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. प्रत्येक तालुक्यातील एक शिक्षक याप्रमाणे जिल्हा पुरस्कारासाठी जिल्हयातील 13 शिक्षकांची आणि प्रत्येक तालुक्यातील एक शिक्षक याप्रमाणे तेरा तालुक्यातील तेरा शिक्षकांची उत्तेजनार्थ पुरस्कारासाठी निवड केली जाते. सदरची निवड शासनाने ठरवून दिलेल्या जिल्हा निवड समितीच्या मार्फत गुणांकनानुसार केली जाते. सदर शिक्षकांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सपत्निक गौरव करण्यात येतो. जिल्हा परिषदेच्या सन 2013-14 च्या मूळ अंदाजपत्रकामध्ये रक्कम रू. 2,50,000/- इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.

पूर्व माध्यमिक/माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेत तसेच राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या (राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या )विद्यार्थ्यांचा गौरव करणे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्रमांक एससीएच-1005/(132/05) /साशि-1 दि. 10 ऑगस्ट 2005 अन्वये पूर्व माध्यमिक/माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा व राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा यामध्ये स्पृहणीय यश संपादन करून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविणा-या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांचा संबंधित जिल्हयाच्या मा. पालकमंत्री महोदय यांचे हस्ते दि. 15 ऑगस्ट रोजी गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्याचा कार्यक्रम सन 2005-06 पासून स्वतंत्रपणे आयोजीत करण्यात यावा असे कळविण्यात आलेले आहे.
जिल्हा परिषदेच्या सन 2013-14 च्या अंदाजपत्रकामध्ये रक्कम रू. 15,00,000/- इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.

जवाहर वाचनालय पुस्तक खरेदी/ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन - पुणे जिल्हा परिषदेतील कर्मचारी वर्गाचे मनांेरंजन व्हावे व त्याच बरोबर ज्ञानार्जन व्हावे देशातील विदेशातील घडमोडीची त्यांना माहिती व्हावी या उद्विष्टाने जवाहर वाचनालयांची स्थापना ही 1 जुलै 1966 या वर्षात स्थापना करण्यांत आलेली आहे. सुरुवातीला वाचनालय फक्त जि.प.कमर्चा-यासाठी सुरु करण्यांत आले होते. कालांतराने यात वाढ होऊन शासनमान्य ग्रंथालय म्हणुन मान्यता मिळाली. आणि वाचनालय सर्व थरातील लोकांसाठी मुक्तद्वार ग्रथालय झाले. वाचनालय ही समाजांेपयोगी योजना असुन नफा तोटयाच्या व्यावहारीक तत्वावर आधारलेली नाही. तरीही सभासद होणेसाठी सध्या रु.200/- अनामत रक्कम आणि मासिक वर्गणी रु.20/- आकारण्यांत येत असुन वाचनालय अ इतर दर्जा मिळालेला असुन दरवर्षी रु.192000/- शासकिय अनुदान मिळते. यातुन सेवक पगार, पुस्तके खरेदी, मासिक, साप्ताहीके,दैनिक खरेदी पुस्तके, बायडींग इतर सादिल खर्च करण्यांत येतो. अनुदान ,मासिक वर्गणी,अनामत रक्क्म इ.सर्व रकमा जि.प.फंडात जमा करण्यांत येतात. सध्या वाचनालयांची सभासद संख्या 532 आहे. रोज सतरा दैनिक घेतली जातात. मासिक संख्या 60 आहे. तसेच साप्ताहिक ते पाक्षिक घेतलेी जातात. दरवर्षी सभासदांसाठी दिवाळी अंक ही खरेदी केले जातात. मराठी, हिंदी, इंग्रजी, अशी मिळून एकुण 16000 पुस्तके सध्या वाचनालयात आहेत. वाचाल तर वाचाल असे डाँ. आंबेडकरांनी सांगितल्या प्रमाणे पुणे जिल्हा परिषद हा उपक्रम राबवित आहे. जिल्हा परिषद निधीचे सन 2013-14 या वर्षाकरीता जि.प.चे मूळ अंदाजपत्रकात रक्कम रू. 2,00,000/- इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.

यशवंतराव चव्हाण कला व क्रीडा सांस्कृतिक महोत्सव - जिल्हयातील इ.1 ली ते इ.7 वीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास होवून कला क्रीडा गुणांना वाव मिळावा भौगोलिक माहिती व्हावी, जिल्हयातील विदयार्थ्यांमध्ये यानिमित्ताने भेटी होवून सुसंवाद साधावा, खेळाडू वृत्ती वाढीस लागावी म्हणून यशवंतराव चव्हाण कला , क्रीडा महोत्सव अंतर्गत शाळास्तर ते जिल्हास्तरावर विविध स्पर्धा घेण्यात येतात . जिल्हा परिषदेच्या सन 2013-14 च्या मूळ अंदाजपत्रकामध्ये रक्कम रू. 20,00,000/- इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.

सावित्रीबाई फुले व महात्मा फुले सांस्कृतिक कार्यक्रम मौजे खानवडी ता. पुरंदर जि.पुणे येथे कै. सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांचे स्मरणार्थ दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजीत केले जातात. यानिमित्ताने कै. सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांचे जीवनावर आधारीत विद्यार्थ्यांच्या वत्कृत्व स्पर्धा , चित्रकला स्पर्धा व व्याख्याने इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जिल्हा परिषदेच्या सन-2013-14 च्या अंदाजपत्रकात जिल्हा परिषद निधीमधून रक्कम रू. 50,000/- एवढी तरतूद करून योजना राबिवली जाते.

प्राथमिक शाळागृहांची/शैाचालय दूरूस्ती करणे. प्राथमिक शाळागृह दुरूस्तीच्या प्रलंबित देयके व प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देऊन सदरचे अनुदान कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग उत्तर / दक्षिण जि.प.पुणे यांचेकडे वर्ग करण्यात येते. जिल्हा परिषद निधीचे सन 2013-14 या वर्षाकरीता जि.प.चे मूळ अंदाजपत्रकात रक्कम रू. 70,00,000/- इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.

शाळागृह इमारतींना संरक्षक भिंत बांधकाम /दुरुस्ती .
शाळागृह इमारतींना संरक्षक भिंत बांधकामांची प्रलंबित देयके व प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देऊन सदरचे अनुदान कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग उत्तर / दक्षिण जि.प.पुणे यांचेकडे वर्ग करण्यात येते. जिल्हा परिषद निधीचे सन 2013-14 या वर्षाकरीता जि.प.चे मूळ अंदाजपत्रकात रक्कम रू. 18,00,00,000/- इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.

शिष्यवृत्ती / प्रज्ञाशोध परीक्षा पूर्व तयारी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील प्रज्ञावान विद्यार्थ्यांंचा शोध घेण्याकामी पूर्वी इ. 4 थी मधील विद्यार्थ्यांची प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात येत होती. तथापी सन 2005-06 पासून पूर्व माध्यमिक/ माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जि.प.प्राथमिक शाळेमधील इ. 4 थी आणि इ. 7 वी मधील सर्व विद्यार्थ्यांना बसविण्यात येते. सदर पूर्व माध्यमिक / माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांंचा पूर्व तयारी व्हावी व जास्तीतजास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत समाविष्ट व्हावेत या हेतूने सन 2005-06 या वर्षापासून जि.प.शाळेच्या इ. 3 री व इ. 6 वी मधील विद्यार्थ्यांची प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात येते. जिल्हा परिषद निधीचे सन 2013-14 या वर्षाकरीता जि.प.चे मूळ अंदाजपत्रकात रक्कम रू. 8,00,000/- इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.

डोंगरी व दुर्गम भागातील गावात शिक्षक निवासस्थान बांधणे जिल्हयातील डोंगरी व दुर्गम भागातील गावांत जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची निवासाची सोय व्हावी या हेतूने सन 2006-07 पासून ही योजना सुरू करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या सन 2013-14 च्या मूळ अंदाजपत्रकामध्ये रक्कम रू. 20,00,000/- इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.

पूर्व माध्य/माध्य.शाळा शिष्यवृत्ती परीक्षा फी भरणे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेकडून दरवर्षी पूर्व माध्य/माध्य. शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. जिल्हा परिषद शाळेतील इ. 4 थी व इ. 7 वी मधील सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेस बसविणेंत यावे व त्याची फी जिल्हा परिषदेने भरावी असे धोरण ठरले. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेस बसवून त्यांची गुणवत्ता वाढावी आणि जिल्हयातील जास्तीतजास्त विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीत समावेश व्हावा या हंेतूने सदर योजना राबविण्यात येते. जिल्हा परिषदेच्या सन 2013-14 च्या मूळ अंदाजपत्रकामध्ये रक्कम रू. 27,00,000/- इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.

स्काऊट गाईड प्रशिक्षण विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करून त्यांना चारित्र्यवान बनवून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण व्हावी या हेतूने जिल्हा परिषद शाळांमध्ये स्काऊट व गाईड ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत स्काऊड गाईड मास्टर व गाईडस यांना पुस्तके देऊन प्रशिक्षण देणे ही योजना राबविण्यात येत असून स्काऊट पथकातील विद्यार्थ्यांना आवश्यक ते साहित्य पुरविण्यात येते. सदर योजना जिल्हा स्काऊट व गाईड प्रशिक्षण संस्थेच्या सहकार्याने राबविण्यात येत असून संबंधित विद्यार्थ्यांना गणवेश व साहित्य वाटप करण्यात येते. जिल्हा परिषदेच्या सन 2013-14 च्या मूळ अंदाजपत्रकामध्ये रक्कम रू. 1,00,000/- इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.

जिल्हा परिषद आदर्श शाळेस जि.प.अध्यक्ष चषक देणे. दर्जेदार प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरणअंर्तगत प्राथमिक शिक्षणाचे कामकाज (अध्ययन / अध्यापन ) उत्कृष्ट पध्दतीने व्हावे. व शाळांचा सर्वांगीण विकास व्हावा. व शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढावा, स्वच्छता अभियान अंतर्गत शालेय परिसर स्वच्छ राहावा. व शालेय इमारत स्वच्छ ठेऊन शाळांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी या हेतूने पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची निकषाप्रमाणे निवड करण्यात येते. यासाठी तयार करण्यात आलेल्या विहीत पुस्तिकेव्दारे शाळांचा अ + , अ, ब, क आणि ड दर्जा निश्चित केला जातो. अ+ दर्जा प्राप्त करणा-या शाळांची विहीत तपासणी पथकाकडून 90 पेक्षा जास्त गुण प्राप्त करणा-या शाळांची तपासणी करून गुणांकन केले जाते. गुणांकनानुसार सर्वात जास्त गुण मिळविणा-या शाळेची जिल्हा परिषद अध्यक्ष चषकासाठी निवड केली जाते. जिल्हा परिषदेच्या सन 2013-14 च्या मूळ अंदाजपत्रकामध्ये रक्कम रू. 1,00,000/- इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.

आम्ही इंग्रजी शिकतो (We learn English ) - पुणे जिल्हा परिषदेमार्फत सन- 2013-14 मध्ये इ. 4 थी ते इ. 6 वी करीता शाळांमध्ये आम्ही इंग्रजी शिकतो “ We learn English” हा कार्यक्रम घेण्यात येतोे. सदरच्या कार्यक्रमाची निर्मिती ही CENTER FOR LEARNING RESOURCES PUNE-06 या संस्थेने केलेले असून प्रादेशिक माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्याचे इंग्रजी संभाषणाचे कौशल्य वाढविणे. हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सदरचा कार्यक्रम जि.प.पुणे मार्फत सन-2010-11 पासून राबविण्यात येत आहे.

सदरच्या उपक्रमामुळे होणारे शैक्षणिक फायदे -

शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी संभाषणाचे ज्ञान अवगत होईल. ग्रामिण भागातील पालकांना आपल्या पाल्याची इंग्रजी संभाषणाची शाश्वती मिळेल. विद्यार्थ्यांला समाजात आत्मविश्वासाने वावरण्यास मदत होईल. ग्रामिण भागातील विद्यार्थी इंग्रजी अत्यत प्रभावशाली पध्दतीने संभषाण करु शकेल. प्रकल्पाचे स्वरूप- पुणे जि.प. च्या प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी संभाषण कौशल्ये विकसित करण्याकरीता सन-2010-11 मध्ये इ.4 थी, सन-2011-12 मध्ये इ.5वी, सन-2012-13 मध्ये इ.6 वी या शैक्षणिक वर्षानुसार प्रकल्प घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उपक्रमाची कार्यवाही - दि.15/07/2013 पासून पुणे जिल्ह्यातील सर्व जि.प.प्राथ.शाळंामधील इ.4 थी, इ. 5 वी व इ. 6 वी च्या विद्यार्थ्यांना “आम्ही इंग्रजी शिकवतो” (We learn English) हा इंग्रजी संभाषणबाबतचा कार्यक्रम आकशवाणी , पुणे 101 MHz वरुन प्रसारण करण्यात येत आहे. जिल्हा परिषद आणि सीएलआर च्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या आम्ही इंग्रजी शिकतो या प्रकल्पात स्तर 1 (इयत्ता 4 थी साठी) 84 पाठ आणि स्तर 2 (इयत्ता 5 वी साठी) 81 पाठ स्तर – 3 (इ. 6 वी ) 80 पाठ प्रसारित करीता आहेत. इ.4 थी ते इ. 6 वी करीता - सोमवार ते शुक्रवार 15 मिनिटांचा एक याप्रमाणे पाठ प्रसारण खालीलप्रमाणे - प्रथम प्रसारण - इ. 4 थी साठी स्तर 1 मधील पाठ सकाळी 11.00 वा. इ. 5 वी साठी स्तर 2 मधील पाठ दुपारी 12.15 वा. प्रसारित केले जातात इ. 6 वी साठी स्तर 3 मधील पाठ दुपारी 1.00 वा. प्रसारित केले जातात जिल्हा परिषदेच्या सन 2013-14 च्या मूळ अंदाजपत्रकामध्ये रक्कम रू. 14,00,000/- इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.

सेमी इंग्रजी (Semi-English) :- इ. 5 वी वी मधील विद्यार्थ्यांना सामान्य विज्ञान व गणित हे विषय इंग्रजी माध्यमातून शिकविणे. दि. 5 ते 7 जून 2012 रोजी जिल्हास्तरावर शिक्षकांसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये 3 दिवसांचे प्रशिक्षण घेण्यात आले. जिल्हा परिषदेतील शाळांतील विद्यार्थ्यांची गळती रोखणे. विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी विषयाची भीती दूर करणे. जिल्हा परिषदेच्या सन 2013-14 च्या मूळ अंदाजपत्रकामध्ये रक्कम रू. 1,00,000/- इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.

प्राथमिक शाळेसाठी सौर अभ्यासिका स्थापन करणे . जि.प.प्राथ. शाळेते विद्यार्थ्यांसाठी सौर अभ्यासिका सुरु करणेसाठी जिल्हा परिषदेच्या सन 2013-14 च्या मूळ अंदाजपत्रकामध्ये रक्कम रू. 50,00,000/- इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.

केंद्र शाळेसाठी क्रीडा साहित्य पुरविणे- जि.प. शाळातील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये नैपुन्य प्राप्त करावे. तसेच विद्यार्थ्यांच्या कला आणि क्रीडा गुणांना वाव मिळण्यासठी ही योजना सुरु करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषदेच्या सन 2013-14 च्या मूळ अंदाजपत्रकामध्ये रक्कम रू. 1,50,00,000/- इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.

जिल्हा परिषद शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सायकल पूरविणे. जि.प. प्राथ. शाळातील शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शाळेत जाणे येणे सुकर होणेसाठी ही योजना सुरु करणेत आली आहे. जिल्हा परिषदेच्या सन 2013-14 च्या मूळ अंदाजपत्रकामध्ये रक्कम रू. 30,00,000/- इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.

शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम - गुणवत्तेतील विविध घटक

  1. पटनांेदणी, उपस्थिती व गळती
  2. बौध्दिक विकास
  3. भावनिक विकास
  4. शारीरिक विकास
  5. शिक्षकांचे सक्षमीकरण
  6. लोकसहभाग
  7. ई-लर्निंग (E- learning)
  8. मूल्यमापन व संनियंत्रण
  9. श्रेणीकरण

जिल्हा परिषदेच्या सन 2013-14 च्या मूळ अंदाजपत्रकामध्ये रक्कम रू. 6,00,00,000/- इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.

शिक्षण व क्रीडा समितीचा तपशील

शिक्षण समितीच्या कामासंबधी तपशीलः- शिक्षण विभागाच्या विविध योजनांना मंजुरी देणे व त्याची अंमलबजावणी बाबत पर्यवेक्षण करणे . विषय समितीच्या मासिक सभेमध्ये दरमहा येणारे विषय :-

वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या महत्वाच्या पत्रांची माहिती घेणे. सर्वांगिण शैक्षणिक गुणवत्ता वाढ विकास कार्यक्रमाचा आढावा घेणे.
शालेय पोषण आहार बाबत आढावा घेणे. पगार, पेन्शन , बजेट, ऑडीट पॉइंट बाबत आढावा घेणे.
जि.प. प्राथमिक नविन शाळांना मान्यता देणे.
जि.प. प्राथमिक शाळांमध्ये नैसर्गिक वाढीने वर्गांना मान्यता देणे. शिक्षण विभागाच्या विविध योजनांना मान्यता देणे.

शिक्षण व क्रीडा समितीचा तपशील

शिक्षण समितीच्या कामासंबधी तपशीलः- शिक्षण विभागाच्या विविध योजनांना मंजुरी देणे व त्याची अंमलबजावणी बाबत पर्यवेक्षण करणे . विषय समितीच्या मासिक सभेमध्ये दरमहा येणारे विषय :-

वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या महत्वाच्या पत्रांची माहिती घेणे. सर्वांगिण शैक्षणिक गुणवत्ता वाढ विकास कार्यक्रमाचा आढावा घेणे.
शालेय पोषण आहार बाबत आढावा घेणे. पगार, पेन्शन , बजेट, ऑडीट पॉइंट बाबत आढावा घेणे.
जि.प. प्राथमिक नविन शाळांना मान्यता देणे.
जि.प. प्राथमिक शाळांमध्ये नैसर्गिक वाढीने वर्गांना मान्यता देणे. शिक्षण विभागाच्या विविध योजनांना मान्यता देणे.